आगर टाकळी परिसरातील सनदी वाटप करा – महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री.रोहितकुमार राजपूत यांची भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की भूमिअभिलेख खात्यामार्फत आगर टाकळी राजवाडा व परिसरातील घरचा सिटी सर्व्हे करण्यात आला १ वर्ष होऊन देखिल अद्याप पर्यंत भूमी अभिलेख विभागाने आगर टाकळी व परिसरातील नागरिकांच्या सनद वाटप केल्या नाही सतत पाठपुरावा केला जात आहे परंतु भूमी अभिलेख विभागाने दाद न दिल्याने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून १५ दिवसांच्या आत सनद वाटप न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.याप्रसंगी महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, कपिलदेव शर्मा, पप्पू भाई कोहली, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »