गोवा सरकारच्या वतीने उल्लेखनीय कला व सामाजिक कार्याची दखल;उरुळी कांचनच्या शिवराज साने यांना ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्कार २०२६’

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: कला, सामाजिक बांधिलकी आणि आपल्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत उरुळी कांचन येथील शिवराज साने यांना प्रतिष्ठेचा ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. स्वर कला संघ आणि गोवा समाज कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला.आमदार गोविंद गावडे, आमदार पेमेंद्र शेट तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर यांच्या हस्ते शिवराज साने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक योगदान देणाऱ्या तसेच कला आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

शिवराज साने यांना मिळालेल्या या सन्मानामुळे उरुळी कांचनसह हवेली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्काराची बातमी समोर येताच विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून साने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.या पुरस्कार सोहळ्यास आयोजक डॉ. बाळकृष्ण खरात, फिरोज शेख, उपसंपादक राहुल खरात, संदीप रासकर, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कानगावचे सरपंच राहुल चाबुकस्वार, रघुनाथराव ढोक, फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशन ट्रस्टच्या राखी रासकर, जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेखा शिवराज साने, पूजा कोटी, सुरेखा यश बेहरा, मिलिंद सरवदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »