व्हाॅइस ऑफ मीडिया, उत्तर महाराष्ट्र विभागाचा नाशिक येथे रविवारी विभागीय ‘केडर कॅम्प-26’

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: जागतिक स्तरावर केवळ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे एकमेव संघटन असलेल्या व्हाॅईस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरम नाशिक तर्फे उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि विभागीय कार्यकारीतील पदाधिकारी यांचा एकदिवसीय विभागीय ‘केडर कॅम्प नाशिक-2026’ रविवार दि. 11 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक येथे होत आहे. गंगापूर रोड वर असलेल्या मॅरेथॉन चौकातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आय एम आर टी काॅलेजच्या कॅम्पस मधील सभागृहात सकाळी 9 पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत होत असलेल्या या केडर कॅम्पचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी व्हाॅईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलजी म्हस्के, प्रदेश अध्यक्ष विजयजी चोरडिया हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तर समारोपाला पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक आणि गझलनवाज भिमरावदादा पांचाळे उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक तथा विभागीय अध्यक्ष दिलीप साळुंके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

चार सत्रात विभागलेल्या या नेतृत्व विकास कार्यशाळेत इंटरनॅशनल मोटीवेशनल स्पिकर डॉ. रत्नाकरजी अहिरे, मुंबई, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त तथा लाईफ कोच व समुपदेशक डॉ. सितारामजी कोल्हे, सायबर क्राईम मुंबई चे पोलीस निरीक्षक दीपकजी देसले, आधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक सागरजी पाटील, राज्य कोर कमेटीच्या प्रमुख रश्मी भदुर्गे, गौतम वाघ, रियाज मुल्ला, आदी विषय तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी व्हाॅईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय व प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते विभागीय कार्यकारिणीतील नूतन पदाधिकारींना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.उत्तर महाराष्ट्र विभागीय केडर कॅम्प-26च्या यशस्वीतेसाठी प्रमुख संयोजक व व्हाॅईस ऑफ मीडिया चे राज्य प्रवक्ते डॉ नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष महानगर कपिल भास्कर, जिल्हा अध्यक्ष ग्रामीण बापूसाहेब चव्हाण, उपाध्यक्ष नरेंद्र जोशी, विभागीय कार्यकारीणितील पदाधिकारी दिपक भावसार, अजय भोसले, अय्युब शाह, धनंजय बोडके, ब्रिजकुमार परिवार, जनार्दन गायकवाड, सलीम सय्यद, संतोष जाधव, अनिल शिंदे, हिरालाल लोथे, रामेश्वर गिरी, दिपक भालेराव, रमजू तांबोळी, आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »