साक्ष न्यूज: कोणार्क नगर येथील मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात आयोजित करण्यात आली.या कार्यशाळेत अनिता खोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचे महत्त्व, पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच गणेशमूर्ती तयार करण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने अतिशय सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या.कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांना वाव दिला. ‘पर्यावरणाचे रक्षण आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा सुंदर प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अहिरे सर, वर्गशिक्षिका श्रीमती कुंभारे मॅडम तसेच श्रीमती कोल्हे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळेला उत्साहाचे वातावरण लाभले. शाडू मातीपासून स्वतः गणेशमूर्ती घडविण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा ठरला.
