नशामुक्त समाजासाठी माणिकखांबमध्ये विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा

२६ जून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्त यांनी केलेल्या आवाहनानुसार माणिकखांब गावात अमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय, माणिकखांब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढत ग्रामस्थांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. “नशामुक्त समाज – निरोगी समाज”, “अमली पदार्थांना नाही म्हणूया” अशा प्रभावी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.यावेळी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित आकर्षक चित्रे काढून समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण केली.

कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. विजयकुमार सोमनाथ येशी, श्रीमती संगीता रमेश अहिरे, श्री. सोमनाथ अशोक सोनवणे, श्री. संजय निवृत्ती कांदेकर तसेच शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामपंचायत कर्मचारी मच्छिंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी वृक्षप्रेमी व दारणा नदी सेवक इगतपुरी तालुका श्री. बंटी पगारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेत मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त करत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी यावेळी संदेश दिला की, “अमली पदार्थांना कायमचा नकार द्या, निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्या.”या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात सकारात्मक जनजागृती निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »