साक्ष न्यूज: मुक्तीभूमी येवला येथे येत्या १३ ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. भीमराव यशवंतराव आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य मा. सुजात दादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा कमिटीच्या वतीने चंद्रमणी बुद्ध विहार, नांदूर नाका, नाशिक येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटी सदस्य डॉ. चित्राताई कु-हे, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्षा लीनाताई खरे, जिल्हा सरचिटणीस शरद भोगे, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष चावदास भालेराव, महिला विभागाच्या अध्यक्षा वनिताताई मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष रवी पगारे, युवक आघाडीचे अध्यक्ष दीपक पगारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ पवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा संघटक प्रशांत अहिरे, इगतपुरी तालुका अध्यक्ष शरद सोनवणे, त्र्यंबक तालुका अध्यक्ष अरुण काशीद, दिंडोरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, निफाड तालुका अध्यक्ष सचिन हिरे, सविताताई पवार, जिल्हा सचिव बाळासाहेब जाधव यांनी धम्म मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध महत्त्वाच्या सूचना केल्या.
देश संक्रमणाच्या अवस्थेतून जात असून आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. एका बाजूला आरक्षणातील उपवर्गीकरणासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाच्या विरोधात आंदोलने उभी केली जात आहेत. मागासवर्गीय समाजाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात असल्याचा आरोप करण्यात आला असून महागाईने उच्चांक गाठल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. अशा विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर धर्मांतर वर्धापन दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यात मा. भीमराव आंबेडकर व मा. सुजात आंबेडकर येत असून सरकारच्या धोरणांबाबत दोन्ही नेते कोणती भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे धम्म मेळाव्याचा प्रचार व प्रसार गावागावापर्यंत पोहोचविणे गरजेचे असून प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेण्याचे आवाहन करण्यात आले.मेळावा भव्य-दिव्य करण्यासाठी धम्मदानाची आवश्यकता असून मंडप, स्टेज, साऊंड सिस्टिम तसेच मेळाव्यास येणाऱ्या नागरिकांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. गाव व शहराच्या मुख्य ठिकाणी मेळाव्याचे पोस्टर व बॅनर लावण्याबरोबरच प्रत्येक कार्यकर्त्याने हा कार्यक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले. पक्षाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम सर्व जाती-धर्माच्या नागरिकांपर्यंत घेऊन जाऊन ते व्यापक करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात धम्मदान देण्याचे जाहीर केले.१३ ऑक्टोबर रोजी मुक्तीभूमी येवला येथे होणाऱ्या धम्म मेळाव्यास हजारो नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी रत्नाकर साळवे, यशवंत शिंदे, महेश भोसले, पूजा मेश्राम, नेहा दीपक, रेखा दिवे, मनीषा निरभवणे, मीनाताई साळवे, शिला साळवे, सत्यभामा राव, आशिष विधाते, प्रकाश तिडके, राहुल तिरपुडे, प्रकाश कुमार मोरे, एकनाथ भालेराव, भगवान बच्छाव, भाऊलाल कटारे, मधुकर पगारे, हिरामण गायकवाड, विजयकुमार गजभिये, विनोद शिंदे, नितीन वाघ, प्रभाकर कांबळे, सोमनाथ मोहिते, सोमनाथ गायकवाड, महेंद्र उनवणे, काळू गांगुर्डे, किशोर पगारे, दीपक बनसोडे, यशवंत शिंदे, नामदेव गांगुर्डे, विक्की मकासरे, रोहित निरभवणे, युवराज मनेरे, संतोष वाघ, तालुका अध्यक्ष नामदेव गांगुर्डे, धीरज भाई गांगुर्डे, संपर्कप्रमुख काळु गांगुर्डे, विठाबाई धीवर, विजयाताई निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव यांनी केले, तर आभार जिल्हा सरचिटणीस शरद भोगे यांनी मानले.
