इगतपुरी (प्रतिनिधी) — इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इगतपुरी तालुक्याच्या वतीने तहसिलदार मा. अभिजीत बारावकर यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन पीक विमा कंपनीकडून कुठल्याही अटी-शर्तीशिवाय सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. गोरख बोडके, तसेच तालुकाध्यक्ष श्री. पांडुरंग वारुंगसे उपस्थित होते. या दोघांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे भातपिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या वेळी मा. जि.प. सदस्य श्री. जनार्दन माळी, मा. तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, श्री. सुनिल वाजे, श्री. पांडुरंग शिंदे, श्री. अरुण गायकर, श्री. नारायण वळकंदे, श्री. मदन कडू, श्री. ज्ञानेश्वर कडू, श्री. राखाराम गव्हाणे, श्री. तुकाराम सहाने, श्री. रतन बांबळे, श्री. वसंत भोसले, श्री. गौतम भोसले, श्री. राम शिंदे, श्री. पांडुरंग खातले, श्री. रमेश देवगिरे, श्री. नामदेव शिंदे आदी सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाला आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत देण्यात यावी, अन्यथा पक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र भूमिका घेईल.
