मुंढेगाव फाट्याजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक
मुंबई-नाशिक आग्रा महामार्गावर आज दिनांक 02 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 4.35 वाजता मुंढेगाव फाट्याजवळ दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ घोटी येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अपघातात सहभागी झालेल्या मोटरसायकलींचे क्रमांक MH-15-GN-2764 व MH-15-CQ-5208 असून अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे १) शुभम गजानन इंगळे (वय 19, रा. त्रिमूर्ती चौक, नाशिक) , २) गेनू बाजीराव धोंगडे (वय 47) ,३) सुनिता गेनू धोंगडे (वय 32, रा. बेलगाव कुऱ्हे, ता. इगतपुरी) आहेत.
अपघातानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या ॲम्बुलन्सने सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतुकीचा ताण हलका केला.अपघाताचे नेमके कारण समजले नसले तरी दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.घटनास्थळी चालक निवृत्ती गुंड (गोंदे फाटा ऑबुन्सच) यांनी मदतकार्य केले.
