नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा; शाळेत जनजागृती कार्यक्रम

बातमी शेअर करा

नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी आज दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी नाशिक शहरातील मातोश्री सरस्वती विद्यामंदिर, कोणार्क नगर येथे नायलॉन मांजा विरोधी जनजागृती मोहीम उत्साहात राबविण्यात आली.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी “नायलॉन मांजा बंद करा”, “सुती मांजा वापरा”, “मानव-प्राणी-पक्ष्यांचे संरक्षण करा” असे संदेश देण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून सामूहिक नायलॉन मांजा विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच त्यांना समुपदेशन करण्यात आले.नायलॉन मांजामुळे मानव, प्राणी व पक्ष्यांना होणाऱ्या गंभीर जखमा व मृत्यूची माहिती देत सुती मांजा वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

पर्यावरणपूरक पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी मासोळे सर तसेच बहिणाबाई महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षिका श्वेता तांगडे मॅडम यांनी मकर संक्रांतीचे महत्त्व व पर्यावरण रक्षणाबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास केंद्र क्रमांक १९ चे केंद्रप्रमुख भोये सर, मातोश्री शाळेचे मुख्याध्यापक अहिरे सर, तसेच गहिवारे सर, पाटील मॅडम, गायकवाड सर, मासोळे सर आणि श्वेता तांगडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नायलॉन मांजाविरोधात जनजागृती निर्माण होऊन पर्यावरण संरक्षणाचा ठोस संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »