वाडीवऱ्हे : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाडीवऱ्हे येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय सैनिक श्री. अनिल तानाजी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. सूर्यवंशी सर, संचालिका सौ. ठोके मॅडम, श्रीमती सूर्यवंशी मॅडम तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कापडणीस सर यांच्यासह गावातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इगतपुरीचे माजी सभापती श्री. गोपाळराव लहांगे, श्री. रावसाहेब कातोरे, भारतीय सैनिक श्री. अनिल जाधव, श्री. भाऊसाहेब माळुंजकर, श्री. भगवान कातोरे, श्री. हिरामण कातोरे, श्री. बाणेश्वर माळुंजकर, श्री. दिलीप माळुंजकर, श्री. रोहिदास कातोरे, श्री. दत्तात्रय कातोरे, श्री. किरण कातोरे, पत्रकार श्री. शरद माळुंजकर, साक्ष न्यूज प्रतिनिधी श्री. गणेश लहामटे, श्री. एकनाथ मुतडक, ॲड.भारत दुकाने, ग्रामविकास अधिकारी श्री. दळवी साहेब, श्री. नथु कातोरे, श्री. रोहिदास टिळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालय परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, देशाप्रती असलेली जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम याबाबत मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
