दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिल्लोळी येथे माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. गावातील माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. संपत भाऊ भरसट यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्यांमध्ये सौ. मनिषा ताई रमेश भरसट (सरपंच), श्री. दशरथ भाऊ बुरंगे (उपसरपंच), श्री. देविदास मोतीराम पवार, श्री. दिगंबर कचरू भरसट, श्री. वाल्मीक गायकवाड, श्री. रमेश मधुकर भरसट, श्री. रामदास आबाजी भरसट, श्रीम. यशोदाबाई सिताराम भरसट (माजी सरपंच), श्री. एकनाथ लक्ष्मण भरसट, श्री. निवृत्ती राऊत, श्री. शरद रामा गायकवाड व श्री. चंद्रकांत रामा गायकवाड यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. राहुल सोनवणे यांनी शासनाच्या माजी विद्यार्थी संघ रचनेविषयीचे परिपत्रक वाचून दाखविले आणि शाळेच्या विविध गरजांविषयी उपस्थितांना माहिती दिली. त्यांनी शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.
या वेळी श्री. रामदास भाऊ भरसट यांनी गावातील नोकरीस असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी व प्रगतिशील शेतकऱ्यांनी शाळेच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. श्री. गणेश सिताराम भरसट यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित केले.ग्रामपंचायत अधिकारी श्री. रावसाहेब मिस्तरी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावातील सद्यस्थितीचा आढावा घेत शाळा व गावाच्या विकासात लोकसहभागाचे महत्व विशद केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. संपत भाऊ भरसट यांनी गावाच्या एकतेचा गौरव करत सांगितले की, “गावाने एकदिलाने ठरविले तर शाळा खोली उभी करणे अवघड नाही.” त्यांनी ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शाळा विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या शेवटी श्री. तुकाराम राऊत यांनी आभार प्रदर्शन केले. पुढील ३–४ दिवसांत सर्वांच्या सल्ल्याने माजी विद्यार्थी संघाची रचना करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. तोपर्यंत इच्छुक माजी विद्यार्थी शाळा बांधकामासाठी आपले आर्थिक योगदान मुख्याध्यापकांच्या खात्यावर QR कोडच्या माध्यमातून जमा करू शकतील.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीम. ज्योती तुंगार (भरसट), श्रीम. हेमलता भरसट, श्री. दिगंबर विष्णु भरसट, श्री. यशवंत खिल्लार, श्रीम. कांचना पालवी, श्रीम. लताताई भरसट, श्री. दिगंबर सुरेश भरसट आदी शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.🌿 तिल्लोळीच्या माजी विद्यार्थ्यांचा एकच संकल्प — आपल्या शाळेचा विकास आणि गावाचा उत्कर्ष!
