सर्वतीर्थ टाकेद, ता. ११ : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोक कलावंतांनी जपली जतन केली मात्र ते अजूनही शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करतात. अनेक वेळा शासनाचे उंबरठे झिजवले मात्र यश आले नाही. लोक प्रतिनिधींकडे पाठपुरावा केला परंतु त्यांनीही या गरीब कालावंतकडे दुर्लक्ष केले. पारंपारिक कलावंतांनी दखल शासनाने घ्यावी अन्यथा या प्रश्नांसाठी कलावंतांना बरोबर घेऊन मोठा लढा दिला जाईल असा ठणठणीत इशारा कलावंतांचे नेतृत्व करत विश्वास कांबळे यांनी दिला. साकुरफाटा येथे पारंपारिक लोक कलावंताची बैठक जेष्ठ कलावंत ज्ञानेश्वर वाघमारे यांनी आयोजन केले होते. या वेळी कलावंत महिलांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा करून लक्ष वेधले.
श्री कांबळे पुढे म्हणाले की, तमाशा कलाकार पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्र भर प्रभोधन सामाजिक काम करतात टाळागाळातील गाव पाड्यावरील कलाकार मानधनापासून अजूनही वंचित आहेत. मी गोर गरीब कलावंताचे हाल अपेकष्टा शासना पर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे, पारंपारिक कलाकारांना सौरक्षण होणे गरजेचे असून त्यांना पंधरा लाखाचा विमा मिळाला पाहिजे सरकारने मोफत उपचार करावा, कलावंताच्या नोंद करून सांस्कृतिक विभागाने यंत्रणा राबवली पाहिजे अनेक वर्षांपासून कारवाई केली नसल्याची व्यथा मांडली. कलावंताची नोंद घेऊन ओळखपत्र मिळाले पाहिजे. शासनाने छोटा -मोठा तमाशा असा भेदभाव करू नये, कलावंतांना राजाश्रय दिला गेला पाहिजे, वर्ष भर कार्यक्रम मिळाले तर पोटाचा प्रश्न मिटेल, कलाकार भाड्याच्या खोलीत राहतात, मुख्यमंत्रयांनी कलावंतांना जात नाही बघता ते एक कलाकार आहे हे समजून घरकुल देण्यात यावे निराधार कलाकारांची बाजू मांडावी असेही ते म्हणाले. याप्रसंगी लावणी समराञी नंदाताई गोरे ( पुणेकर ) सुरेखाताई पुणेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नाशिक तसेच इतर जिल्ह्यातील कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
