मुनिंद्र अहिरे (पंचवटी प्रतिनिधी) :
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रद्धास्थान, समाजकार्य व शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक कै. कमलताई विसपुते (ताईसाहेब) यांची १३ वी पुण्यतिथी मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, कोणार्कनगर, आडगाव (नाशिक) येथे अत्यंत श्रद्धा व आदरभावनेने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक मुनिंद्र अहिरे सर यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात कै. कमलताई विसपुते यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून करण्यात आली. यानंतर गैवरे सर यांनी ताईसाहेबांच्या कार्याचा व त्यांच्या प्रेरणादायी आठवणींचा भावनिक शब्दांत आढावा घेतला.
शिक्षण, शिस्त आणि सामाजिक जाणीव या मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवण करणारी त्यांची वाटचाल आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.पुण्यतिथीनिमित्त केवळ अभिवादन न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांनी दत्तमंदिर येधे येथे जाऊन मंदिर परिसर व गार्डनची स्वच्छता केली. या उपक्रमातून स्वच्छता, सेवाभाव व सामाजिक जबाबदारीचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मासुळे सर यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कै. कमलताई विसपुते यांचे विचार व कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
