(हरीश तुपलोंढे, नाशिक पश्चिम प्रतिनिधी) ता. त्र्यंबकेश्वर 19 फेब्रुवारी – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेझे गावात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. गावभर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमात बोलताना बेझे गावचे सरपंच तथा अंजनेरी गटाचे जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार कैलास भाऊ पोटिंदे यांनी शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की,”हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता; अन्यायाविरुद्ध लढणारा विराज दादाचा एक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही, तर जगात एक होता.”तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “प्रजेला ज्यांनी मायबाप मानले, शत्रूचा उडाला थरकाप; स्त्रियांना दिला मातेचा सन्मान, अशा छत्रपती शिवरायांचा आम्हाला अभिमान आहे.”
यावेळी कैलास भाऊ पोटिंदे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आगामी निवडणुकीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात केली. कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी सुरेश चव्हाण, प्रभाकर चव्हाण, भाऊराव चव्हाण, गंगाधर चव्हाण, नंदू चव्हाण यांसह बेझे गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.शिवजयंती निमित्त गावात उत्साहाचे आणि ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये शिवचरित्राबद्दल प्रेरणा निर्माण झाली असून स्वराज्याच्या विचारांचा जागर जागर प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला
