त्र्यंबकेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरणदिन उत्साहात साजरा; ९८ वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक भेटीला अभिवादन

बातमी शेअर करा

काळू गांगुर्डे (त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता त्र्यंबकेश्वर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्र्यंबकेश्वर भेटीच्या स्मरणार्थ स्मरणदिन श्रद्धेने व उत्साहात साजरा करण्यात आला. १८ जानेवारी १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्र्यंबकेश्वर येथे आले होते, त्या ऐतिहासिक घटनेस आज ९८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुका, पुरुष-महिला संघटना तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. यावेळी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी ताई तुंगार, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रमेशभाऊ जाधव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, तालुका सरचिटणीस रमेशभाऊ गांगुर्डे, जिल्हा संघटक अरुण शिंदे, महिला अध्यक्ष सोनमताई गांगुर्डे, बौद्धाचार्य मोहन देहाडे, छबाबाई गांगुर्डे, सुभाष सोनवणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार व पुष्प अर्पण करण्यात आले.याप्रसंगी समता सैनिक दलाचे लक्ष्मण मगर, खजिनदार साहेबराव पालवे, रघुनाथ सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे नेते किरण मोंढे, मिराताई गांगुर्डे, सुमित्रा गांगुर्डे, यशोदा सोनवणे, विशाल जाधव, ॲड सिद्धार्थ शिंदे, प्रकाश देहाडे, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा अंगीकार करून समता, बंधुता व न्यायाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका सरचिटणीस हनुमंत देहाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामूहिक सरणतेनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »