दैनिक साहित्य लीला पंढरी पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. विविध विषयांवरील कविता सादरीकरणा बरोबर कला क्षेत्रातील मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती.उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेस व कला मंचचे संस्थापक अध्यक्ष संगीतकार श्री शिवराज साने यांच्या उत्कृष्ट संगीत योगदानाबद्दल त्यांना उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे सौ. पौर्णिमा वानखेडे यांच्या शुभ हस्ते प्रदान करुन गौरविण्यात आले. कार्यक्रम ओक सभागृह शनिवार पेठ पुणे या ठिकाणी पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुशील सातपुते यांनी केले. तर आभार प्रदर्शन कवी रंजीत पवार जुन्नर यांनी केले.
संगीतकार शिवराज साने यांना दै. साहित्य लीला पंढरी पुणे यांजकडून उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार प्रदान
Oplus_131072
