नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक 2/3/2026 सोमवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने नाशिक येथे काळाराम मंदिर कोनशिला व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन करण्यात आले..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे होते..याप्रसंगी गांगुर्डे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह पाच साडेपाच वर्ष परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली लढला गेला असून ह्या समतेच्या लढ्यात अनेक सत्याग्रहींनी आपले योगदान दिले आहे त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी नाशिक येथे भव्य सत्याग्रही स्मारक उभारण्याची मागणी राज्य सरकारकडे गांगुर्डे यांनी केली.
याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रियल नॅशनल पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमश्री विजयराज पगारे, नाशिक शहराध्यक्ष मुकुंद काळे, समाजभूषण सुभाष बोराडे, जिल्हा नेते विनोदभाऊ जाधव, नाशिक रोड जयंती अध्यक्ष आकाश भालेराव, जिल्हा नेते भारतजी म्हसदे, जिल्हा नेते दिलीपजी पगारे, जिल्हा नेते किशोरभाऊ गांगुर्डे, जिल्हा नेते सुनीलभाई यशवंते, जिल्हा नेते गोटीरामजी पवार, सामाजिक कार्यकर्ते संजयजी भालेराव, सामाजिक कार्यकर्ते ताराचंदजी काळे, महिला आघाडीच्या नेत्या विमलताई तडवी, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
