शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

बातमी शेअर करा

कोणार्क नगर येथे माननीय दादाजी भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दत्ता मोगरे फ्रेंड सर्कल कोणार्क नगर व मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, कोणार्क नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाला माननीय दिगंबर मोगरे, प्रशांत बुवा तसेच कोणार्क नगरमधील अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भदाने सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुनिंद्र अहिरे सर तसेच दिगंबर मोगरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »