प्रतिनिधी : काळू गांगुर्डे
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव केंद्राच्या वतीने आयोजित बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ३० डिसेंबर २०२५ रोजी आश्रमशाळा डहाळेवाडी येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावीहर्षच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले.
सांस्कृतिक विभागात सामूहिक नृत्य (मोठा गट) स्पर्धेत वावीहर्ष शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक नृत्य (लहान गट) या प्रकारात कु. खुशी चंद्रकांत किर्वे हिने प्रथम क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधले.शैक्षणिक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. मॅथ बी गट क्रमांक १ मध्ये आयुष मधु बांगारे (प्रथम), तर मॅथ बी गट क्रमांक ३ मध्ये ज्योती तुकाराम आगिवले हिने उत्कृष्ट कामगिरी केली.स्पेल बी स्पर्धेतइ. ३री : स्वराज भगवान डोखे (प्रथम), इ. ७वी : ज्ञानेश्वरी काशिनाथ सारुक्ते (प्रथम)इ. १ली : वृषभ मोहन गोडे (द्वितीय)असे निकाल लागले.
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती वावीहर्ष तसेच वावीहर्ष ग्रामस्थांच्या वतीने सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.वावीहर्ष शाळेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून आगामी तालुकास्तरीय स्पर्धेतही अशीच उज्ज्वल कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
