सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद शाळा, नांदडगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचा वेष धारण करून त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल बावीस्कर सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन करत मुलांना शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष व समाजसुधारणेतील त्यांचे योगदान समजावून सांगितले. तसेच शाळेचे शिक्षक राकेश महाले सर, चव्हाण सर आणि प्रियांका खातळे मॅडम यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी महिला बचत गटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.सदर कार्यक्रमास शोभा भडांगे, सरला सोनवणे, सरला भरीत, कोमल सोनवणे, सत्यभामा खातळे, अलका बंदावणे, मिलिंद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
