‘नांदी फाउंडेशन’तर्फे मातोश्री सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींची ‘एक्स्पोजर व्हिजिट’; तारांगण व विज्ञान केंद्राला भेट

बातमी शेअर करा

मुनिंद्र अहिरे सर (पंचवटी प्रतिनिधी): नांदी फाउंडेशनच्या वतीने मातोश्री सरस्वती विद्यामंदिर व बापूसाहेब डी.डी. विसपुते माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थिनींसाठी आज एक विशेष शैक्षणिक सहल अर्थात ‘एक्स्पोजर व्हिजिट’ आयोजित करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी नाशिक महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरला भेट देत विज्ञानाच्या अद्भुत विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.या भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक आहिरे सर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी विज्ञान केंद्रातील विविध विभागांची सखोल पाहणी केली. विद्यार्थिनींमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि खगोलशास्त्रातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजाव्यात, या उद्देशाने नांदी फाउंडेशन व शाळा प्रशासनाने संयुक्तपणे हा उपक्रम राबवला.

तारांगणामध्ये विद्यार्थिनींनी ग्रह, तारे व नक्षत्रांची माहिती देणारा विशेष शो पाहिला. त्यानंतर सायन्स सेंटरमध्ये विविध वैज्ञानिक उपकरणे व प्रयोगांची सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साह व कुतूहल पाहायला मिळाले.

तारांगणामध्ये विद्यार्थिनींनी ग्रह, तारे व नक्षत्रांची माहिती देणारा विशेष शो पाहिला. त्यानंतर सायन्स सेंटरमध्ये विविध वैज्ञानिक उपकरणे व प्रयोगांची सविस्तर माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साह व कुतूहल पाहायला मिळाले.या संपूर्ण आयोजनाचे नियोजन संध्या धोंडीराम दिघे यांनी केले, तर निरंजना मॅडम यांनी मार्गदर्शनाची भूमिका पार पाडली.तसेच पवार मॅडम यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी मुख्याध्यापक आहिरे सर यांनी नांदी फाउंडेशनच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, अशा शैक्षणिक सहली विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत व्यक्त केले.

या उपक्रमाबद्दल पालकवर्ग तसेच शिक्षण क्षेत्रातून समाधान आणि सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असून, नांदी फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »