कुशेगावात ‘भिम जल्लोष संध्या’चा जल्लोष; सायली पाटीलच्या ‘नाद खुळा’ कार्यक्रमाची रंगणार मेजवानी

बातमी शेअर करा

इगतपुरी | प्रतिनिधी : वंचित बहूजन आघाडी प्रणित सम्राट युवा ग्रुपच्या वतीने कुशेगाव येथे संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त भव्य “भिम जल्लोष संध्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना सायली पाटील हिचा लोकप्रिय “नाद खुळा” कार्यक्रमही रंगणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.हा भव्य सांस्कृतिक सोहळा मंगळवार दिनांक १२ मे रोजी रात्री ८ वाजता कुशेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. युवा नेते चंद्रकांत भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून गावकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जयंती अध्यक्ष सचिन सोनवणे, नितीन सोनवणे, दिलीप सोनवणे, दिपक सोनवणे, युवराज सोनवणे, प्रकाश सोनवणे, शाईनाथ सोनवणे तसेच समस्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांसह भीमगीतांचा जल्लोष, युवकांचा उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »