त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) :त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेकडून “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत शहर विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या श्री. सुभाष हरी सोनवणे यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिक व निष्ठावान सेवेला मान्यता देत त्यांना विशेष गौरवपत्र प्रदान करण्यात आले.या गौरवपत्रात नमूद केल्याप्रमाणे, श्री. सोनवणे यांनी आपल्या कार्यालयीन पदाशी एकनिष्ठ राहून सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. शहराच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम तसेच नागरिकांना दिलेल्या सेवेमुळे त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या कार्यातून निःस्वार्थ सेवाभाव स्पष्टपणे दिसून येतो, अशी भावना व्यक्त करण्यात आली.त्रिंबक नगरपरिषद च्या वतीने आयोजित या सन्मान सोहळ्यात नगराध्यक्ष श्रीमती त्रिवेणी सोमनाथ तुंगार यांच्या हस्ते दिनांक १ मे २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथे हे गौरवपत्र प्रदान करण्यात आले.“सेवा धर्मः परमः श्रेयः, परहितं कर्तव्यं सर्वदा” या संदेशाने प्रेरित होत समाजसेवेच्या कार्यात सातत्य ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान हा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेकडून सुभाष सोनवणे यांचा गौरव; शहर विकासातील योगदानाची दखल
