मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करा – महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे

बातमी शेअर करा

नाशिक (प्रतिनिधी) आज दिनांक 22 मे 2026 शुक्रवार रोजी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रोहितकुमार राजपूत साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनाचा विषय असा आहे की मागासवर्गीय तरुण तरुणींनी कोराना काळात व्यवसायासाठी महात्मा फुले महामंडळ आण्णाभाऊ साठे महामंडळ संत रविदास महामंडळ व अन्य महामंडळ मार्फत कर्ज घेतले होते परंतु कोरोना काळात व्यवसाय बुडाल्याने ते वेळेवर हप्ते भरू शकत नाही व जसे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले त्याच धर्तीवर मागासवर्गीय तरुण तरुणी चे कर्ज माफ करावे तसेच अनेक वर्षां पासून महात्मा फुले महामंडळ यांना सरकारने निधी न दिल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचे प्रकरणे धूळ खात पडले असून राज्य सरकारने त्वरित मागासवर्गीय तरुणांना कर्जाचे वितरण करावे तसेच महात्मा फुले विकास महामंडळास पूर्ण वेळ अध्यक्षाची नेमणूक करावी.

याप्रसंगी भिमटोला सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रमेशजी साळवे, महानगर प्रमुख सुरेशजी जाधव, ज्येष्ठ नेते विष्णू गांगुर्डे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »