क-होळे ग्रामपंचायतीतील कारभारावर प्रश्नचिन्ह; ग्रामपंचायत अधिकारी सहा महिन्यांपासून गैरहजर असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

बातमी शेअर करा

क-होळे गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकारी प्रियांका सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून गावात नियमितपणे उपस्थित राहत नसून अनेक प्रशासकीय कामे प्रलंबित आहेत.गावात पाणीटंचाई, वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या तसेच विविध नागरी सुविधांबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, या समस्यांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक वेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 1 मे महाराष्ट्र दिन यांसारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय महत्त्वाच्या कार्यक्रमांनाही ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल केल्याचे सांगितले असून, या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावातील मूलभूत समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »