वैतरणा धरणाजवळ अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

बातमी शेअर करा

मोखाडा तालुक्यातील कारेगाव गाव हद्दीत वैतरणा धरणाजवळ एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित इसमाचे वय अंदाजे 60 ते 70 वर्षे असून तो मोठ्या दगडाच्या सावलीत मृतावस्थेत आढळून आला.घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.सदर अनोळखी इसमास कोणी ओळखत असल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित मोखाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या घटनेबाबत अधिक तपास मोखाडा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »