जागतिक महिला दिनानिमित्त अस्वलीहर्ष येथे भव्य महिला मेळावा

बातमी शेअर करा

अस्वलीहर्ष (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 10 मार्च 2026 रोजी अस्वलीहर्ष येथे महिला सक्षमीकरणासाठी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा Swayam Shikshan Prayog (टोका स्वयं शिक्षण प्रयोग संस्था) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संस्थेअंतर्गत असलेल्या दहा गावांमधील सुमारे 300 ते 350 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश महिलांनी केवळ चुलीपुरते मर्यादित न राहता कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच स्वतःचे उद्योग-धंदे सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. उपस्थित महिलांना स्वरोजगार, बचत गट आणि लघुउद्योगाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक नृत्य, प्रेरणादायी भाषणे आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.या प्रसंगी सौ. अंजलीताई हेमंत ठाकूर, सौ. सुनीता विनोद घोटे, इंदुबाई पांडुरंग कडाळे, सकुबाई तुकाराम बोढारे, गौरी अमोल कावरे, पूजा गोकुळ दिवे, चंद्रभागा चंद्रकांत खोरगडे आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या.तसेच संस्थेचे प्रतिनिधी प्रकल्प व्यवस्थापक श्री. रवींद्र भोये, तालुका समन्वयक शांताराम कातडे व ललित बोराडे, नितीन दोद्याड यांच्यासह सखी – संगीता पिंगळे, संगीता कडाळी, कृतिका देहाडे, पुनम चंद्रे, रेखा जाधव, धनश्री कोंढार, कविता फसाळे, कविता अंबापुरे, योगिता घोटे, भारती दिवे या उपस्थित होत्या.महिलांच्या मोठ्या प्रतिसादामुळे हा महिला सक्षमीकरणाचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »