भारतीय बौद्ध महासभा, नाशिक जिल्हा (पश्चिम) अंतर्गत इगतपुरी तालुक्याची नवीन कार्यकारिणी रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी निवडण्यात आली. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक जिल्हा (पश्चिम) प्रभारी अध्यक्ष कृष्णाजी सोनवणे हे होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस शरद भोगे, जिल्हा प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष प्रकाश जगताप, जिल्हा संस्कार सचिव मनोज गाडे, जिल्हा संरक्षण सचिव मनोज मोरे तसेच जिल्हा संघटक भाऊलाल कटारे यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले
यावेळी इगतपुरी तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली.तालुकाध्यक्ष – अनिकेत बळवंत उबाळे,सरचिटणीस – प्रभाकर चिकणे,कोषाध्यक्ष – किशोर रोकडे,उपाध्यक्ष (संस्कार) – राहुल शिंदे, उपाध्यक्ष (पर्यटन व प्रचार) – जगन बर्वे, उपाध्यक्ष (संरक्षण) – शरद सोनवणे, हिशोब तपासणी – मिलिंद पंडित, कार्यालयीन सचिव – गिरीश वानखडे, सचिव (संस्कार) – रवींद्र घाटेसाव, बळीराम शिरसाठ, सचिव (पर्यटन व प्रसार) – साहेबराव गांगुर्डे, सचिव (संरक्षण) – रोहन साबळे,संघटक – शांताराम उबाळे, नितीन नेटावटे, सुनील पगारे, जगन बर्वे, नंदू पगारे, भाऊसाहेब गांगुर्डे आदी.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून भारतीय बौद्ध महासभेची विचारधारा अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविणे, सामाजिक प्रबोधन, संघटन बळकटीकरण आणि समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी नव्या कार्यकारिणीचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. आगामी काळात इगतपुरी तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनपर उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
