माणिकखांब परिसरातील रहिवासी श्री. विठ्ठल दिलीप गांगड (वय ३०) यांचा रेल्वे रुळावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेतील विठ्ठल गांगड यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. याचदरम्यान नाशिकच्या दिशेने जाणारी वंदे भारत एक्सप्रेस माणिकखांबजवळ थांबवण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुमारे ३० मिनिटे उभी होती. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित घटना ‘रन ओव्हर’शी निगडित असल्याने गाडी थांबवण्यात आली होती.गंभीर जखमी विठ्ठल गांगड यांना उपचारासाठी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सुरक्षितपणे बसवण्यात आले. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने वंदे भारत एक्सप्रेस नाशिकच्या दिशेने रवाना झाली.
माणिकखांब येथे रेल्वे रुळावर अपघात, युवक गंभीर; चक्क ‘वंदे भारत’ 30 मिनिटे थांबवली
