साने संगीत विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारोह उत्साहात संपन्न.

बातमी शेअर करा

सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य अंतर्गत भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळ, पुणे आयोजित साने संगीत विद्यालयाच्या वतीने गुणगौरव सत्कार समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्पा लेले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक विनोद अष्टुळ व युवा उद्योजक सागर बाळासाहेब कांचन उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना जेष्ठ साहित्यिक विनोद अष्टुळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संगीत ही केवळ कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आपल्या कलागुणांना वाव देऊन सातत्याने सराव, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे, असे त्यांनी सांगितले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळते आणि भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव करत गुणवंत विद्यार्थी व संबंधितांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, महंत गोपालव्यास कपाटे (महानुभाव), लोकमतचे पत्रकार सहदेव खंडागळे, महासुपर फास्ट न्यूजच्या संपादिका सुवर्णा कांचन, महाराष्ट्राची भूमीचे पत्रकार बापुसो चौधरी, गुरुदत्त तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनिल तुपे यांच्यासह पालक व विद्यार्थी साने संगीत विद्यालयाचे संगीतकार गायक.मा. आदरणीय शिवराज ज्ञानोबा साने सर परीक्षेला बसलेले उपस्थित विद्यार्थी कु. ओमकार बगाडे, श्रीशा काकडे ,वेदांत कुतवळ ,पार्थ बोत्रे, साई जाधव ,वैष्णवी साळुंखे, पूर्वी ठाकरे, रियान पराग, आरोही साळुंखे, कृष्णा लहोरे, सृष्टी भोसले, ऋतुजा आवळे, हर्षद बोबडे, सुयश घनवट, शौर्य सुरवसे, संकेत खंडागळे, सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ रेखा शिवराज साने व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराज साने यांनी केले. सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक श्री रोहिदास बिचकुले सर यांनी केले, तर आभार पत्रकार श्री अमोल भोसले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »