इगतपुरीत डोंगरावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; जामुंडे शिवारातील काळदरा परिसरातील घटना

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: इगतपुरी तालुक्यातील जामुंडे शिवारातील हिवाळा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काळदरा परिसरात डोंगरावरून खाली पडल्याने २४ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी घडल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मृत तरुणीचे नाव सोमी शिवा भगत (वय २४, रा. धारवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमी भगत ही जामुंडे शिवारातील हिवाळा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काळदरा परिसरात असताना उंच डोंगरावरून खाली पडली. या दुर्घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.या घटनेची खबर पोलीस पाटील जगन्नाथ मोहन आगविले, रा. भावली यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार इगतपुरी पोलिस ठाणे अ.मृ. रजि. नं. ४५/२०२६, BNSS कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा अहवाल कार्यकारी दंडाधिकारी, इगतपुरी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. घटना नेमकी कशी घडली, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »