साक्ष न्यूज: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट व भिमटोला सामाजिक संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नाशिकचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांना महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले..निवेदनाचा विषय असा आहे की लोकशाहीर वामनदादा कर्डक हे महाराष्ट्राच्या सामाजिक साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीतील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. आपल्या शाहिरीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामाजिक समता बंधुता स्वाभिमान शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश जन सामान्य पर्यंत पोहोचविला वामनदादांनी आपल्या गीतामधून आणि शाहिरीतून वंचित शोषित व कष्टकरी समाजाच्या वेदनांना वाचा फोडली त्यांच्या साहित्याने आणि लोक जागृतीच्या कार्याने महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला मोठे बळ मिळाले त्यांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून सामाजिक प्रबोधनाच्या व्यापक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे अशा या महान लोकशाहीच्या स्मृतींचे जतन व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नाशिक शहरात वामनदादा कर्डक यांचा भव्य व देखणा पुतळा उभारण्यात यावा तसेच त्यांच्या नावाने स्मारक सांस्कृतिक केंद्र उभारण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे तसेच वामनदादा कर्डक यांच्या दीर्घकालीन सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आणि लोकप्रबोधनाच्या योगदानाचा विचार करून त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी.
याप्रसंगी रिपाई ज्येष्ठ नेते महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, जिल्हा नेते मुकुंदराव काळे, जिल्हा सचिव रविभाऊ गांगुर्डे, जिल्हा नेते चंद्रशेखर बहाळकर, युवा नेते दिपकभाऊ शिंदे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
