रेल्वे पटरीजवळ ५५ ते ६० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर पोल क्रमांक १५३/३३ जवळ अंदाजे ५५ ते ६० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. अंगावर पांढरा फुल शर्ट व पांढरी फुल पॅन्ट, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, पायात ‘मदन’ नाव लिहिलेले काळे बूट, आतून पांढरी कोपरी आणि कमरेला लाल करदोडा होता. उजव्या हातावर सूर्याचे चिन्ह गोंदलेले आहे.या इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्याचे नातेवाईक परिचित असल्यास घोटी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क :पो.नि. विजय शिंदे – ९९२३८७९९५१, पो.हवा. गांगुर्डे – ७७४४००८५८८, पो. कॉ. पवार – ८३२९८५१४५२ , पो. कॉ. निसाळ – ७७७६९७५४२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »