गोंदे फाट्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; पती-पत्नी गंभीर जखमी

बातमी शेअर करा

साक्ष न्यूज: मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे फाटा येथे मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) सकाळी सुमारे ७.१५ वाजेच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, गोंदे फाटा येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ दुचाकी क्रमांक MH-15-BK-2675 वरून रामदास खंडू उघडे (वय ५६) आणि त्यांच्या पत्नी किरण रामदास उघडे (वय ४५, रा. मोगरे, ता. इगतपुरी) जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या विनामूल्य रुग्णवाहिका सेवेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेच्या मदतीने दोन्ही जखमींना उपचारासाठी नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनीही तत्परतेने मदतकार्य केले. दरम्यान, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »