प्रसिद्ध लेखक नवनाथ गायकराच्यां “खुराडा” कथेस पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा

आहुर्ली ता ईगतपुरी येथील प्रसिद्ध लेखक नवनाथ अर्जुन पाटिल गायकर यांचे खुराडा या सहस्रबाहु दिवाळी अंकात प्रकाशित कथेस ईगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे वतीने पारितोषिक जाहिर झाले आहे. या पुरस्काराचे वितरण नुकतेच नाशिक येथे आयोजीत २६ व्या साहित्य संमेलनात सुप्रसिध्द नाटय लेखक तथा या संमेलनाचे अध्यक्ष दत्ता पाटिल यांचे हस्ते गायकर यांना प्रदान करणेत आला. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त न्यायधीश वसंत पाटिल, प्रसिद्ध लेखिका श्रीमती अलका दराडे, संमेलनाचे आयोजक तथा मंडळ अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर आदि मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान हा सन्मान घरातला असुन, यामुळे लेखणीस बळ प्राप्त झाले आहे अशी प्रतिक्रिया नवनाथ गायकर यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली आहे. गायकर यांचे या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातुन स्वागत करणेत आले. गायकर हे ग्रामिण ढंगातील विनोदी व गंभीर , गुढ कथालेखक म्हणुन प्रसिद्द असुन त्यांचा आघाडी हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे.विविध दिवाळी अंक व वर्तमानपत्रात कथा, कवितासह विविध सामाजिक विषयावर भाष्य करणारे त्यांचे विपुल लिखाण प्रसिद्ध झालेले आहे.

“तालुक्यातला सन्मान हा मोलाचा राज्यभरात विविध सन्मान प्राप्त झाले आहेत.पण आजचा हा सन्मान तालुक्यातला, म्हंणजेच घरचा असुन तो आपल्यासाठी खुप मोलाचा आहे. ” – गायकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »