सामान्य व दिव्यांग वधुवर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद!

बातमी शेअर करा

नाशिकमध्ये पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर सामान्य आणि दिव्यांग वधुवरांचा परिचय सोहळा

नाशिक (प्रतिनिधी) — नाशिक शहरात पहिल्यांदाच सामान्य व दिव्यांग वधुवर परिचय मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अग्रेसन भवन, बनकर चौक, नाशिक येथे संपन्न झालेल्या या अनोख्या मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमाचे आयोजन लोकनिर्माण बहुद्देशीय संस्था अध्यक्ष चंदन खरे, अनिता खरे तसेच श्रेया विश्व दिव्यांग संस्था चे पंकज बैरागी, मनिषा बैरागी आणि शांताईमाता बहुउद्देशीय संस्था चे बाळासाहेब वैष्णव यांच्या पुढाकाराने करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गुंजन शिवदे व नियती शेट्टी या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गणेशवंदना नृत्याने कार्यक्रमाला शुभारंभ झाला.प्रमुख पाहुणे म्हणून अजय भोसले, डॉ. योगेश सदगीर, देविदास बैरागी, पंकज सर, बंटी अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव तसेच गुजरातसह विविध ठिकाणांहून सुमारे चारशे ते पाचशे वधुवर व पालकांनी उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर पठारे, ज्योत्स्ना सोनार, तब्बू शेख, जबर शेख आदींनी परिश्रम घेतले. या मेळाव्याद्वारे समाजात सामान्य व दिव्यांग व्यक्तींमधील विवाहसंबंधाची दरी कमी करण्याचा आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »