कोणार्कनगरमध्ये स्व. कमलताई विसपुते पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व सामाजिक उपक्रम

Oplus_131072

बातमी शेअर करा

मुनिंद्र अहिरे (पंचवटी प्रतिनिधी) : कोणार्कनगर येथे आज मातोश्री स्व. कमलताई विसपुते यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक विद्यालय, कोणार्कनगर येथे स्व. कमलताई विसपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी श्री. पिंगळे सर यांनी मातोश्रींच्या कार्याचा गौरव करत संस्था व परिवारावर त्यांनी दिलेल्या माया, ममता आणि संस्कारांच्या सावलीबद्दल मनोगत व्यक्त केले. त्यांच्या विचारांमुळे आजही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुण्यतिथीचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर सोसायटी, कोणार्कनगर येथील महा रामेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या उपक्रमातून स्वच्छता, सामाजिक भान आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरांजली आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून स्व. कमलताई विसपुते यांच्या स्मृतीस साजरा केलेला हा दिवस उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »