घोटी (ता. इगतपुरी) – भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत घोटी शहर शाखा पुरुष व महिला कार्यकारिणी यांच्या वतीने “संविधान समर्थक जोडो अभियान व वर्षावास सांगता समारोह” हा प्रेरणादायी कार्यक्रम शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी नालंदा बुद्ध विहार, घोटी शहर येथे दुपारी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभेच्या विचारधारेशी सुसंगत असून, संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार, सामाजिक समतेचा प्रसार व बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.या सोहळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. एस. के. भंडारे साहेब, राष्ट्रीय सचिव मा. बी. एच. गायकवाड साहेब तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष मा. यु. जी. बोराडे साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, नाशिक जिल्हा पश्चिम येथील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमात बौद्धाचार्य, समता सैनिक, केंद्रीय शिक्षक व शिक्षिका तसेच विविध शाखांचे पदाधिकारी सहभागी होऊन सामाजिक एकतेचा आणि संविधानिक जबाबदारीचा संदेश देणार आहेत.
भारतीय बौद्ध महासभा ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापलेली असून, तिच्या माध्यमातून आजही समाज परिवर्तनाचा व संविधान रक्षणाचा ध्यास घेतला जात आहे. संस्थेच्या संरक्षिका महाउपासिका मिराताई आंबेडकर व ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीष रावलिया तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशभरात संविधान समर्थ जोडो अभियानाचे उपक्रम राबवले जात आहेत.
घोटी शहरातील हा कार्यक्रम केवळ सांगता सोहळा नसून, समानता, बंधुता आणि सामाजिक जागरूकतेचा उत्सव ठरणार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना “नमो बुद्धाय जय भीम” या घोषणेतून सामाजिक सलोखा आणि आंबेडकरी चळवळीचा नवा जोम अनुभवता येईल.
🌹 आयोजक:भारतीय बौद्ध महासभा – शाखा घोटी शहर, पुरुष व महिला कार्यकारिणी🌹 स्थान: नालंदा बुद्ध विहार, घोटी शहर🌹 दिनांक व वेळ: शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ | दुपारी ११:०० वा.
