“सन्मान संविधानाचा, आधार बहुजनांचा” : चंद्रपूरात २८ नोव्हेंबरला भव्य सोहळा

बातमी शेअर करा

भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधानाच्या गौरवासाठी आणि बहुजन समाजाच्या सन्मानासाठी ‘सन्मान—संविधानाचा आधार बहुजनांचा’ हा भव्य सोहळा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.हा ऐतिहासिक कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वा. न्यू इंग्लिश ग्राउंड, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होणार असून लाखोंच्या संख्येने जनसहभाग अपेक्षित आहे.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आद. डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन. ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व जनतेपर्यंत परिणामकारक पद्धतीने पोहोचवण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध रॅपर विपिन तातड (झुंड फेम) आणि महाराष्ट्रात विद्रोही रॅपर जी म्हणून ओळखले जाणारे कलाकार यांच्या दमदार सादरीकरणांनी कार्यक्रमात ऊर्जा ओतली जाणार आहे.या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्यासह पराग कांबळे, हर्षल शिंदे, करून आनंद, परमेश्वर लाभने, पायल दुर्गे, अल्काताई मोटघरे, रूपाली वानखेडे हे आयोजक विशेष परिश्रम घेत आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजी. नेताजी भरणे, सूत्रसंचालन सचिन फुलझेले तर आभार प्रदर्शन ॲड. राजेश वनकर करतील.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी संविधानाच्या सन्मानासाठी आणि बहुजन आधारस्तंभाच्या दृढ घोषणेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अमित वाघमारे (युथ प्रेसिडेंट, इंटरनॅशनल ह्यूमन राईट असोसिएशन – महाराष्ट्र) तसेच डॉ. प्रशांत रामटेके, प्रा. दुष्यंत नगराळे, अनुताई दहेगावकर, विनोद देशपांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »