व्हीटीसी फाट्यावर भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; 7 जण गंभीर

बातमी शेअर करा

मुंबई–नाशिक आग्रा महामार्गावर व्हीटीसी फाटा (कातोरे पंप) परिसरात मध्यरात्री भीषण अपघात होऊन दोन्ही कारमधील सात जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा हादरवून सोडणारा अपघात आज (21 नोव्हेंबर 2025) रात्री 12.30 वाजता घडला.

नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार दुभाजकावरून उडून समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळली. धडकेचा आवाज परिसरात मोठ्या अंतरावर ऐकू गेला असून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघातात जखमी झालेल्यांना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या ॲम्बुलन्सच्या मदतीने तात्काळ नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अपघातातील दोन्ही वाहने स्कॉर्पिओ MH 15 GR 3003 आणि कार MH 15 KK 1444 असून गंभीर जखमींची यादी जगदिश शंकर वरखेडे (वय 59), रा. जेल रोड,साहेबराव भिला शिरोळे (वय 59), वाळु नामदेव मातेरे (वय 56),विजय शिवाजी पाटिल (वय 53), रा. चिंचलखेडे,दिपक नथु वाघ (वय 50), रा. चिंचलखेडे,दिपक नायसिंग जाधव (वय 30),शुभम सुपडु पाटिल (वय 25), रा. पाथर्डी फाटा, नाशिक उर्वरित दोघांची नावे समजू शकली नाहीत.

अपघातानंतर चालक निवृत्ती गुंड (रा. गोंदे फाटा) तसेच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू करून जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले. वेळीच मिळालेल्या ॲम्बुलन्स सेवेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. महामार्गावरील वेगमर्यादा, दुभाजकांची रचना आणि वाहतूक नियंत्रणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »