“सर्वांसाठी समान हक्काची शिकवण… जि.प. शाळा बेझे येथे संविधान दिन उत्साहात साजरा”

बातमी शेअर करा

कष्ट केलेत माझ्या भिमाने, जातीत-जाती वाढ नका रे…संविधान दिले भारताला, जाण याची तुम्हा राहू दया रे…अशा जोशपूर्ण घोषणांनी आणि देशभक्तीच्या वातावरणात बेझे गावातील जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात बेझे गावाचे सरपंच कैलास पोटिंदे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची महत्त्वाची भूमिका सांगत संविधानाचे पालन करण्याचे आवाहन केले. उपसरपंच अशोक चव्हाण, सदस्य बाळू तुपलोंढे, सुरेश चव्हाण, अशोक बदादे यांनीही संविधानाची अंमलबजावणी आणि सामाजिक समानतेवर भर देणारे विचार मांडले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरीश तुपलोंढे, ग्रामसेवक प्रकाश भोये यांचीही यावेळी उपस्थिती होती.मुख्याध्यापक सोनवणे सर तसेच शिक्षक महाजन मॅडम, लहारे सर, प्रगती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांसह संविधानाच्या मूल्यांवर आधारित नाटिकांनी या कार्यक्रमाला अधिक रंगत आणली.सर्व उपस्थितांनी “संविधानाचा सन्मान — प्रत्येक भारतीयाची जबाबदारी” असा दृढ संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »