त्र्यंबकेश्वर :नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार रिंगणात असून प्रचाराला चांगलेच उधान आले आहे. विशेष म्हणजे शिवसेना (शिंदे गट)च्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार त्रिवेणीताई सोमनाथ तुंगार यांचा प्रचार जोरात सुरू असून त्यांनी विकासाचा ठोस शब्द जनतेसमोर मांडला आहे.घुले आणि शेलार हे दोघेही त्र्यंबकेश्वर श्री देवस्थानचे विश्वस्त असून निवडणुकीच्या रणांगणात ते समोरासमोर येत असल्याने राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार झाली आहेत.
दुसरीकडे अपक्ष उमेदवारांचा प्रचारही वेगाने होत असला तरी इतर पक्षांचा प्रचार मात्र विशेष चमकताना दिसत नाही.त्रिवेणीताई तुंगार यांनी जनतेला दिलेला मुख्य शब्द म्हणजे शुद्ध, सुरक्षित आणि नियमित नळपाणी!त्या म्हणाल्या —३६५ दिवस उत्कृष्ट पाणीपुरवठा,जुनी पाइपलाइन दुरुस्ती व गळतीवर नियंत्रण,नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणी,प्रत्येक प्रभागात अतिरिक्त जलसाठा टाक्या,समान व वेळेवर पाणीपुरवठ्याची हमी
.त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यानुसार पाणी आणि सुव्यवस्थेची गरज अत्यंत महत्त्वाची असून, तुंगार यांच्या विकास आराखड्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.आगामी दिवसांत प्रचार अधिक रंगात येणार असून नगराध्यक्षपदाची ही लढत कोणाच्या बाजूने झुकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
