जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची त्र्यंबकेश्वर तालुका आढावा बैठक संपन्न

बातमी शेअर करा

काळू गांगुर्डे (साक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडी त्र्यंबकेश्वर तालुक्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक दि. २५ जानेवारी २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर येथील विश्रामगृहात संपन्न झाली. ही बैठक वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, पुढील रणनिती व कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.या बैठकीस जिल्हास्तरीय व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखा सक्रिय करण्यावर भर देण्यात आला.जिल्हाध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण, नवीन ग्रामीण व शहरी युवा अध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करत संघटन विस्ताराचे स्पष्ट संकेत दिले. आगामी काळात नियोजनबद्ध पद्धतीने काम करून निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष अरुण भाऊ काशीद यांनी पिंपळद येथे बौद्ध महासभेचे श्रामणेर शिबिर असल्याने १ तारखेनंतर पुढील चार ते सहा दिवसांत त्र्यंबकेश्वर तालुक्यात भव्य सभा घेऊन सर्व वंचित कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचे नियोजन जाहीर केले.या बैठकीस तालुका प्रवक्ते सुरेश काशीद, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर कडलक, सचिव रमेश गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे, किरण मोंढे, दिपक गांगुर्डे, साहेबराव पालवे, अंबादास पालवे, शशी शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मार्गदर्शनाच्या शेवटी चेतन दादा गांगुर्डे यांनी सर्व कार्यकर्त्यांना स्फूर्ती व ऊर्जा देत आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »