मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात क्रीडा महोत्सवाची उत्साहपूर्ण जल्लोषात सांगता!

बातमी शेअर करा

पंचवटी प्रतिनिधी | दि .10 डिसेंबर – मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, कोणार्क नगर, आडगाव येथे शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आणि पाहुण्यांची उपस्थिती यामुळे क्रीडांगणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीमातेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर नारळ फोडून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री मुनिंद्र अहिरे सर, शिक्षकवर्ग आणि बहिणाबाई महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील आंतरवासिता विद्यार्थी-शिक्षिका उपस्थित होत्या.मुख्याध्यापक अहिरे सर व विविध शिक्षक पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

खेळाडूंची प्रतिज्ञा श्वेता तांगडे मॅडम यांनी घेतली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहिनी शिरोळे मॅडम यांनी कौशल्यपूर्णरीत्या पार पाडले.क्रीडा महोत्सवात इयत्ता अनुसार विविध स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता पहिलीची बुक बॅलन्स, इयत्ता दुसरीची बॅकपॅक रेस तसेच इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटातील तीन विद्यार्थ्यांना विजेते घोषित करण्यात आले.

संपूर्ण दिवस रंगलेल्या या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आनंद आणि क्रीडास्पर्धात्मकता वाढीस लागली. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी-शिक्षिकांच्या उपस्थितीत क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »