नाशिक | प्रतिनिधी : अनमोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, कोणार्क नगर, आडगाव, नाशिक येथे इयत्ता पहिलीतील तसेच इतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मुनिंद्र अहिरे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे पालकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन आनंदात स्वागत करण्यात आले. या प्रेमळ स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेची शैक्षणिक परंपरा, नियम व विविध उपक्रम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र मासुळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मिलिंद गैवरे सर यांनी केले.या प्रसंगी विद्यार्थी, पालक आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
