घोटी येथे जिल्हा परिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा भव्य उपक्रम यशस्वी

बातमी शेअर करा

इगतपुरी प्रतिनिधी: जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून इंद्रप्रस्थ लाँन्स, घोटी येथे दिव्यांग सक्षमीकरणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. जिल्हा रुग्णालय नाशिक, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार यांच्या हस्ते झाले. विशेष उपस्थिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती हर्षदा बडगुजर यांची होती. कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले.

कान-नाक-घसा, कर्णबधिर, अंध, मतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग, बौद्धिक अक्षम, मानसिक आजार, मेंदू पक्षाघात, हिमोग्लोबिन कमतरता आदी विविध दिव्यांग बांधवांची 700 ते 800 UDID कार्ड नोंदणी करण्यात आली. तसेच 350 ते 375 लाभार्थ्यांचे आधार व गोल्डन कार्ड ई-केवायसी पूर्ण करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी काही प्रमाणपत्रांचे वाटप करत जाहीर केले की, यापुढे UDID कार्डची नोंदणी थेट प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी महेश वळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी चिमाजी गोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांनी विशेष सहकार्य केले. कनिष्ठ अधिकारी व पंचायत समिती तसेच घोटी ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »