इगतपुरीत रेल्वेखाली अनोळखी पुरुष ठार; पोलिसांचा ओळख पटविण्यासाठी जनतेला मदतीचे आवाहन

बातमी शेअर करा

इगतपुरी तालुक्यातील टाके-घोटी शिवार येथे आज सकाळी (10 डिसेंबर 2025) रेल्वे पोल क्रमांक 146/6 ते 146/8 दरम्यान रेल्वेच्या धडकेत वय 30-35 वर्षांचा अनोळखी पुरुष ठार झाला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मान धडावेगळी झालेल्या स्थितीत तो आढळला. स्थानिकांनी दिलेल्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालय, इगतपुरी येथे हलविण्यात आले.इगतपुरी पोलिसांनी अ.मु.र. 56/2025 प्रमाणे गुन्हा नोंदवून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र अद्याप मृत व्यक्ती किंवा त्याच्या वारसांची कोणतीही माहिती मिळालेली नाही.कोणाकडेही संबंधित माहिती असल्यास इगतपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »