एचआयव्ही/एड्स विरोधात जनजागृतीचा प्रभावी संदेश; आडगाव ट्रक टर्मिनस येथे पथनाट्य सादर

बातमी शेअर करा

पंचवटी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग (DAPCU), मेडिकल कॉलेज आडगाव येथील आय.सी.टी.सी. व ए.आर.टी. विभाग, मॅग्मो वेल्फेअर ट्रकर संस्था तसेच अनंत तरंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आडगाव ट्रक टर्मिनस परिसरात एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले

.या पथनाट्यातून एचआयव्ही/एड्स विषयी असलेले गैरसमज दूर करत प्रतिबंध, तपासणी व उपचाराबाबत महत्त्वाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली. विशेषतः ट्रक चालक व कामगार वर्गामध्ये सुरक्षित वर्तन, नियमित तपासणी आणि उपचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. योगेश परदेशी व जिल्हा परिवेशक सौ. सुनीता बोरसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत एचआयव्ही/एड्स नियंत्रणासाठी समाजाच्या सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय.सी.टी.सी. समुपदेशक रवींद्र सोनवणे, संजय आहेर, ए.आर.टी. समुपदेशक सचिन देसले तसेच आनंद तरंगचे शाहीर उत्तम गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »