नाशिक शहरात 29 डिसेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी

बातमी शेअर करा

नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 29 डिसेंबरपर्यंत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 15 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सभा अगर मिरवणुका लग्नकार्य, रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. तसेच तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »