स्मृतिदिनानिमित्त समाजसेवेचा आदर्श उपक्रम;महासुर्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. भारत बुकाने परिवाराकडून वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदतीचा हात

बातमी शेअर करा

वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथे सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. महासुर्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. भारत शंकर बुकाने यांनी आपल्या मातोश्री स्मृतीशेष तुळसाबाई शंकर बुकाने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून आदर्श निर्माण केला.12 मार्च 2025 रोजी मातोश्री तुळसाबाई बुकाने यांचे निधन झाले होते. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त 12 मार्च 2026 रोजी बुकाने परिवाराने वेगळ्या पद्धतीने स्मरण करण्याचा संकल्प केला.

या निमित्ताने नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हेपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सुखाश्रय वृद्धाश्रम येथे भेट देऊन तेथील सुमारे 50 वयोवृद्ध महिला व पुरुषांना प्रेमाने जेवण देण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना अंगावरील कपडे व गरजेनुसार डायपर यांचेही वाटप करण्यात आले.हा वृद्धाश्रम एका स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविला जात असून यावेळी संस्थेचे संचालक जाधव साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच बुकाने परिवारातील सदस्य, आप्तेष्ट व नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना अ‍ॅड. भारत बुकाने यांनी सांगितले की, स्मृतिदिनाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गरजू, निराधार वयोवृद्ध लोकांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या स्वकीयांच्या स्मृतीदिनानिमित्त समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची परंपरा रुजवली तर समाजात संवेदनशीलता वाढेल.या उपक्रमातून बुकाने परिवाराने समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून उपस्थितांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »